भुसावळातील कोविड सेंटरमधील सुविधांची पोलिस अधीक्षकांकडून पाहणी

0

भुसावळ : कोरोनावर तुम्ही लवकरच मात कराल, असा विश्‍वास देत कर्मचार्‍यांनी घाबरू नये, असे धीर देत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बाधीत कर्मचार्‍यांचे मनोबल उंचावले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गुरूवारी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटर व बियाणी स्कूलला भेट देत कोविड सेंटरमधील सुविधांची माहिती जाणून घेतली.

पोलिस उपअधीक्षक कार्यालयात बैठक
डॉ.उगले यांनी शहरातील पोलिस अधिकार्‍यांची पोलिस उपअधीक्षक कार्यालयात बैठक घेत शहरातील गोळीबारची माहिती जाणून घेतली तसेच गावठी कट्टा आणणार्‍यांवर कडक कारवाईच्या सूचना केल्या. डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे उपस्थित होते.

कर्मचार्‍यांना दिला धीर
राज्य राखीव दलाचे जवान बियाणी स्कूलमध्ये राहत असल्याने त्यांचीही भेट पोलिस अधीक्षकांनी घेत चर्चा केली. डॉ.बाबाासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील कोविड केअर सेंटरला भेट देत दाखल पोलिसांसह रुग्णांच्या सुविधांची माहिती जाणून घेतली. कर्मचार्‍यांनी कर्तव्यावर जातांना दररोज तोंडावर मास्क लावणे आणि सॅनेटायझरने हात स्वच्छ करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.