भुसावळातील ठेवीदाराचा मृत्यू

0

भुसावळ : शहरातील पतसंस्थामधील ठेवीदार तथा सेवानिवृत्त वैद्यकिय अधिकारी बळीराम फिरके (78) यांचे शुक्रवार, 28 रोजी निधन झाले. तालुक्यातील पतसंस्थांमध्ये त्यांनी ठेवलेल्या रक्कमा सन 2008 पासून अद्यापपर्यंत मिळालेल्या नाही. त्या मिळण्यासाठी त्यांनी खान्देश ठेवीदार कृती समितीच्या माध्यमातून संघर्ष केला होता. राज्य सरकारने सहकारी पतसंस्था संचालकांच्या मालमत्ता जप्त कराव्या व संबंधितांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कृती समितीचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांनी केली आहे. डॉ.फिरकेयांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. ते संजय व रवींद्र फिरके यांचे वडिल होते.