भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात नृत्यस्वरांजली कार्यक्रम उत्साहात

0

भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात रांगोळी, चित्रकला, कोलाज, व्यंगचित्र, क्ले मॉडेलिंग, मेहंदी, स्पॉट पेंटिंग, फोटोग्राफी, इंस्टॉलेशन, वक्तृत्व, वादविवाद, काव्यवाचन स्पर्धा झाल्या तर 2 रोजी आयोजित नृत्यस्वरांजली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात कलागुणांचे रंग उधळत उपस्थितीत दाद मिळवली. विद्यार्थ्यांची अंगी असलेल्या विविध सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी गीत गायन, एकल नृत्य, समूह नृत्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

विविध स्पर्धेनिहाय गुणवंत असे
रांगोळी स्पर्धा प्रथम- साक्षी गोराडकर, द्वितीय- मानसी महेश नेवे तर तृतीय – मयुरी रमेश बारी यांनी मिळवला. चित्रकला स्पर्धेत प्रथम- ताहेर राजकोटवाला, द्वितीय- जागृती बर्‍हाटे, तृतीय- पूजा रविंद्र वनारे यांना मिळाले. कोलाज स्पर्धेमध्ये प्रथम- पुनम श्रीकृष्ण पाटील, द्वितीय- जागृती सुनील बर्‍हाटे तर तृतीय- नेहा दिनकर म्हस्के यांनी मिळवला. व्यंगचित्र स्पर्धेत प्रथमज्- दीपक यशवंत वाणी, द्वितीय- प्रतीक खंडू सुर्यवंशी यांना मिळाले. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम- वृषाली कोल्हे, द्वितीय- सायली महाजन, तृतीय- आदित्य तोडकर तर उत्तेजनार्थ पारीतोषिक ईश्वरी मुंदडे यांना देण्यात आले. वादविवाद स्पर्धेत प्रथम- वृषाली कोल्हे, द्वितीय- सायली महाजन, तृतीय- हर्षल भांडारकर तर उत्तेजनार्थ पारीतोषिक अनिकेत पाटील यांना देण्यात आले. फोटोग्राफी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वैभव राजेंद्र बोरोले, द्वितीय चिराग राजेंद्र पाटील तर तृतीय मनीषा पाटील यांनी पटकावला. काव्यवाचन स्पर्धेमध्ये प्रथम अदनान शेख, द्वितीय हर्षल भांडारकर, तृतीय नेहा जयस्वाल तर उत्तेजनार्थ पारीतोषिक वृषाली कोल्हे यांना मिळाला. मेहंदी स्पर्धेमध्ये प्रथम राखी बरडिया, द्वितीय मयुरी महेश बारी तर तृतीय क्रमांक संजना सतीश अलकारी यांनी पटकावला. क्ले मॉडेलिंग स्पर्धेमध्ये प्रथम आकाश अरुण बोदडे, द्वितीय उमेश सुनील गोरधे तर तृतीय कोमल महेश नेवे आला. स्पॉट पेंटिंग स्पर्धेमध्ये प्रथम वैभव बोरोले, द्वितीय मानसी महेश नेवे आला. इंस्टॉलेशन स्पर्धेमध्ये प्रथम- वक्रांत रोडे, उमेश गोरधे, कोमल नेवे, वेदाली जोशी, द्वितीय- आकाश बोदडे, सीमा खंबायत, वैष्णवी ठोके, खुशबू भोळे तर तृतीय- सागर पाटील, सिद्धार्थ पाटील, दीपक वाणी, श्रीराम पाटील यांना मिळाला. 1 जानेवारी रोजी पारंपारिक वेशभूषा दिन साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पेहराव करून हा दिन साजरा केला. यात प्रथम क्रमांक धनश्री जोशी, द्वितीय क्रमांक मराठी मुलींचा समूह तर तृतीय क्रमांक विशाल शेळके यांना पटकालवा.

नृत्य स्वरांजली कार्यक्रमास यांची उपस्थिती
गुरुवार, 2 जानेवारी रोजी नृत्यस्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर संस्थाध्यक्ष डॉ.मोहन फालक, सचिव विष्णुभाऊ चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी. एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे नृत्यस्वरांजली कार्यक्रमाचे परीक्षक योगेश साळसिंगीकर, ईशांत हसरानी, अनिता पाटील, कला मंडळ प्रमुख प्रा.डॉ.पी.ए.अहिरे उपस्थित होते. प्रास्ताविक कला मंडळ प्रमुख प्रा.डॉ.पी.ए.अहिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अखेरीला मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

यांनी मिळवले यश
गीत गायन स्पर्धेचे प्रथम प्रियंका पाटील, द्वितीय खुशी वाघमारे तर तृतीय उमेश जाधव आला. एकल नृत्य स्पर्धेत प्रथम कारीका सपकाळे, द्वितीय संजना सोनवणे तर तृतीय शुभम पवार आला. समूह नृत्य स्पर्धेचे प्रथम पारीतोषिक मॅनेजमेन्ट ग्रुप, द्वितीय पारीतोषिक चैतन्य ग्रुप तर तृतीय पारितोषिक व्हीपीएस ग्रुपला यांना मिळाले. सूत्रसंचालन स्पर्धेचे प्रथम पारीतोषिक किशोर रामेश्वर महाले, द्वितीय जागृती सुनील बर्‍हाटे, सायली महाजन यांना मिळाले. सूत्रसंचालन प्रा स्मिता बेंडाळे, जागृती बर्‍हाटे, प्रतिकेश भालेराव, रवींद्र पवार, अंकिता झांबरे, जय सोनवणे, पूजा बोदडे, किशोर महाले तर आभार प्रदर्शन प्रा. आशिष नवघरे यांनी मानले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी, प्रा.डॉ.के.के.अहिरे, प्रा. डॉ.रेखा गाजरे, प्रा.व्ही.डी.जैन, प्रा.ई.जी.नेहेते, प्रा.डॉ.जे.एफ.पाटील, प्रा.डॉ.विद्या पाटील, प्रा.डॉ.पी.ए.अहिरे, प्रा.एस.टी.धूम, प्रा.एस.के.राठोड, प्रा.डॉ.ममताबेन पाटील, प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर, प्रा.प्रशांत पाटील, प्रा. डॉ.रश्मी शर्मा, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.व्ही.ए.सोळुंके, प्रा.अनिल हिवाळे, प्रा. डॉ.रूपाली चौधरी, प्रा.पुरुषोत्तम महाजन, प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.स्वाती शेळके, प्रा.शंकर पाटील, प्रा.उज्वला महाजन, प्रा.जयश्री चौधरी, प्रा.खुशबू भोळे, प्रा.भारती सोनवणे, प्रा.पूनम महाजन, प्रा.लुब्धा बेंडाळे, प्रा. हेमंत सावकारे, प्रा.वैशाली पाटील, प्रा.भाग्यश्री पाटील, प्रा.भूषण चौधरी, प्रा. प्रियांका वारके, प्रा.स्वाती फालक, राजेश पुराणिक, प्रा.राजश्री देशमुख, प्रा. कुंदन तावडे, वैभव मावळे, प्रभारी प्रबंधक रेखा बर्‍हाटे, प्रभारी कार्यालय अधीक्षक भगवान तायडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कला मंडळ सदस्य यांनी परीश्रम घेतल्याचे प्रसिद्धी समिती प्रमुख प्रा.प्रशांत पाटील कळवतात.