भुसावळातील भावाच्या खून प्रकरणी आरोपीस जामीन

0

भुसावळ- शहरातील खडका रोड भागातील मोहम्मदी नगर भागात मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावानेच आपल्या भावाची सुर्‍याचे वार करून भावाचीच हत्या केल्याची घटना गुरुवार, 8 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. या घटनेत जावेदअली गुलामअली (29) यांचा खून झाला होता तर व्यवसायाने रीक्षा चालक असलेल्या वाहेदअली गुलामअली (27) यास अटक करण्यात आली होती. खुनानंतर आरोपी कारागृहातच होता. त्याची बुधवार, 20 रोजी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.प्रशांत चित्रे यांनी 50 हजारांच्या जात मुचलक्यावर सुटका केली. आरोपीतर्फे अ‍ॅड.अश्‍विनी डोलारे यांनी युक्तीवाद केला.

बिर्याणी बनवताना केली भावाची हत्या
आईचा नेहमीच मोठ्या भावाकडे असलेला ओढा व त्याला मालमत्ता मिळणार असल्याच्या संशयाने आरोपीच्या मनात घर केले होते. यापूर्वीदखील उभयंतांमध्ये कुरबुरी सुरू होत्या तर गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018 सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मयत जावेद अली हा बिर्याणी बनवत असताना त्याचवेळी वाहेद अली तेथे आला व भांडणात आरोपीने भावावर सुरा चालवल्याने त्याचा मृत्यू झाला होता.