भुसावळातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली

0

भुसावळ- शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम असून किराणा दुकानदार सैफुल ईस्लाम शेख अल्लाउद्दीन (मिल्लत नगर, भुसावळ) यांची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीस गेल्या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 14 जून रोजी शेख यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील भिरूड हॉस्पीटलसमोर दुचाकी (एम.एच.19 सी.पी.7738) लावली असताना चोरट्यांनी ती लांबवली. तपास पोलीस नाईक तेजस पारीसकर करीत आहेत.