भुसावळातून साडेतीन लाखांचा मालट्रक लांबवला

0

भुसावळ- शहरातील वरणगाव रोडला लागून असलेल्या हॉटेल यशोदाजवळील ताज मोटर्स गॅरेजजवळून साडेतीन लाख रुपये किंमतीचा मालट्रक लांबवल्याची घटना 26 जुलै रात्री 9.15 ते 27 रोजी सकाळी दहा वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात ट्रक मालक अब्दुल अन्वर अब्दुल गनी शेख (रा.जाम मोहल्ला, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. टाटा मोटर्स कंपनीचा व साडेतीन लाख रुपये किंमतीचा ट्रक (एम.एच.20 ए.टी.7860) हा ताज मोटर्स गॅरेजजवळून चोरट्यांनी लांबवला. सर्वत्र शोध घेवूनही ट्रक मिळून न आल्याने रविवारी ट्रक मालकाने पोलिसात धाव घेतली.