भुसावळात अल्पवयीन तरुणीला पळवले : एकाविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ- शहरातील गौसीया नगरातील 17 वर्षीय तरुणीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी साहिल फिरोज पिंजारी (गौसिया नगर, भुसावळ) याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या अल्पवयीन 17 वर्षीय मुलीस 22 रोजी आरोपीने काहीतरी आमिष देवून पळवून नेले. दरम्यान, गुरुवारी अल्पवयीन तरुणीसह आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसात हजर झाले. तरुणीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहमदवली सैय्यद करीत आहेत.