भुसावळात आजपासून मतदार संघनिहाय मतदान यंत्रांचे होणार वाटप

0 2

तहसीलला यात्रेचे स्वरूप ; प्रत्येक यंत्राचे बारकाईने स्कॅनिंग

भुसावळ- तहसील कार्यालयात सोमवारपासून जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघ निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट, बॅलेट व कंट्रोल युनिटचे वाटप करण्यात येत असून तहसीलला यामुळे यात्रेचे स्वरूप सुरू आहे. बुधवारपासून मतदार संघनिहाय मतदान यंत्रांचे होणार वाटप होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रत्येक मतदान यंत्रावरील बारकोडचे स्कॅनिंग केले जात आहे.

यांची होती उपस्थिती
निवडणूक यंत्र वाटपप्रसंगी जळगाव निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अनंत कळसकर, अव्वल कारकुन किशोर पाटील उपस्थित होते. भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार महेंद्र पवार, नायब तहसीलदार विजय भालेराव यांचेसह अधिकारी व कर्मचार्‍यांचे याकामी सहकार्य लाभत आहे.