भुसावळात उद्या भाजपातर्फे दुचाकी रॅली

0 1

भुसावळ- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निर्देशानुसार देशभरातील मतदारसंघात दुचाकी रॅली काढण्याचे आदेश असल्याने रविवार, 3 रोजी सकाळी नऊ वाजता आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगण (डी.एस.ग्राऊंड) वरून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात कढण्यात येणार्‍या रॅलीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, भाजपा संटघन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, पवन बुंदेले, रमाशंकर दुबे, भालचंद्र पाटील, नारायण कोळी आदींनी एका पत्रकान्वये केले आहे.