भुसावळात उद्या वैद्यकीय व्यावसायीकांचा बंद

0 1

भुसावळ- राष्ट्रीय मेडिकल कॉन्सीलला राष्ट्रीय स्तरावर विरोध दर्शवण्यात आला असून शनिवारी बंद पुकारण्यात आला आहे. भुसावळातील आयएमए संघटनेने या बंदला पाठिंबा दर्शवला असून भुसावळ शहरातील दवाखाने सकाळी सहा ते सायंकाळी सहा दरम्यान बंद राहणार आहेत मात्र तत्काळ सेवेसाठी सेवा दिली जाणार आहे. शहर व तालुक्यातील रुग्णांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आयएमए अध्यक्ष डॉ.सुनील पाटील, सचिव डॉ.मिलिंद धांडे व खजिनदार डॉ.प्रसन्ना जावळे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.