भुसावळात एकावर चाकूहल्ला ; प्रकृती गंभीर

0

भुसावळ- शहरातील रजा टॉवर भागात एकावर किरकोळ कारणावरून एकाने चाकूहल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रजा टॉवर भागात घडल्याने शहरात खळबळ उडाली. या हल्ल्यात ईस्माईल उर्फ सोलू मो.आलम (23, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) हा गंभीर जखमी झाला असून शेख तिहार शेख आजाद ताहेर असे हल्ला करणार्‍या संशयीत आरोपीचे नाव आहे. हल्ल्याची माहिती कळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला गोदावरी रुग्णालयात हलवले. या हल्ल्याचे नेमके कारण कळू शकले नसलेतरी मात्र एका महिलेच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समजते मात्र त्यास अधिकृत पोलिस सूत्रांकडून दुजोरा मिळू शकला नाही.