भुसावळात ‘एक हात मदतीचा’ उपक्रमामुळे गरजूंना दिलासा

0

जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचा उपक्रम

भुसावळ : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव व त्यातच लॉकडाऊनमुळे शहरात सर्वत्र मोलमजूरीची कामे बंद असून खानावळ तसेच दुकाने सुद्धा बंद आहे. अशा परीस्थितीत हातावरचे पोट भरणार्‍या गरजूंची जेवणासाठी मोठी गैरसोय होत आहे. अशा गरीब व गरजू नागरीकांसाठी, मजूरांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे अध्यक्ष नितीन राऊत यांच्या आदेशान्वये व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या सुचनेनुसार उत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाच्या मार्फत भुसावळात ‘एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा’ हा उपक्रम राबविण्यात आला.

गरजूंना दिले जेवण
शहरातील पंचशील नगरातील गोरगरीब हातमजुरी करणार्‍या नागरीकांना अन्न-धान्य तसेच रेल्वे स्टेशन परीसर, बस स्टँण्ड, छत्रपती शिवाजी शॉपींग कॉम्प्लेक्स, डॉ.उन्मेश खानापूरकर यांचे लहान मुलांचे हॉस्पिटल, माता रमाबाई आंबेडकर नगर येथे जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे तसेच उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे समन्वयक योगेंद्रजी पाटील यांच्या हस्ते भोजन दान देण्यात आले. योगेंद्र पाटील, विवेक नरवाडे, सुनील जोहरे, विनोद पवार, ईस्माइल गवळी तसेच विश्वनाथ संदानशीव उपस्थित होते.