भुसावळातील उपस्टेशन मास्तरांचा रेल्वेखाली मृत्यू

0

भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावरील उपस्टेशन मास्तर मिलिंद दिवाकर मार्कंडे (वय 54, रा.कुलकर्णी प्लॉट) यांचा रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कुठल्यातरी रेल्वे गाडीखाली आल्यामुळे मृत्यू झाला. स्वामी समर्थ केंद्रासमोर ही घटना घडली. भुसावळ स्टेशनवर उपप्रबंधक म्हणून कार्यरत मिलिंद मार्कंडे रविवारी स्वामी समर्थ केंद्रासमोरील रेल्वे लाइनवरून जात असताना कुठल्यातरी रेल्वे गाडीचा त्यांना धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत उपस्टेशन प्रबंधकांनी दिलेल्या माहितीवरून लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती कळताच त्यांच्या अनेक सहकार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला.