भुसावळात किरकोळ कारणावरून एकास मारहाण

0

भुसावळ- शहरातील शांती नगर भागात किरकोळ कारणावरून एकास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अनंता जगन्नाथ चिंचोले (49, रा.प्लॉट नंबर दोन, शांती नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी मोनू विकास कुर्‍हे, विकास कुर्‍हे, बंटी लोणारी, सोनू विकास कुर्‍हे व अन्य पाच ते सात इसम (सर्व रा.भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 27 जुलै रोजी सायंकाळी 7.15 वाजता शहरात शांती नगर भागातून तक्रारदार दुचाकीने जात असताना दुचाकीवरून मोनू कुर्‍हे आला व त्याने तक्रारदाराच्या दुचाकीला धडक देत उजव्या पायावरून दुचाकी नेत शिवीगाळ केली. संशयीताचे वडिल विकास कुर्‍हे यांना मोबाईल लावून ही घटना सांगितल्यानंतर त्यांनी अन्य आरोपींना गोळा करीत शिवीगाळ करून मारहाण केली तसेच जिवंत ठेवणार नाही म्हणून धमकीही दिली. शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश कोळी करीत आहेत.