भुसावळात गावठी कट्टा बाळगला ; आरोपी न्यायालयीन कोठडीत

0

भुसावळ- शहर पोलिस ठाण्याजवळील पंचायत समिती कार्यालयाला लागून असलेल्या वैशाली झेरॉक्स दुकानाजवळून गौरव राजू वाघ (27, रा.अंगुरी मेडिकलजवळ, शिवाजी नगर, भुसावळ) या संशयीताला 10 हजार रुपये किंमतीचच्या गावठी कट्ट्यासह मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी अटक केली होती. आरोपीला बुधवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तपास निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोहम्मद अली सैय्यद करीत आहेत.