भुसावळात चाकू हल्ला ; दोघे आरोपी न्यायालयीन कोठडीत

0

भुसावळ- मित्राच्या बहिणीशी असलेल्या प्रेम संबंधाच्या वादातून डी.एस.ग्राऊंडवर जय अशोककुमार दुधाणी (18, आनंद नगर, दीपक जावळे हॉस्पीटलमागे, भुसावळ) या तरुणावर रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास दत्तू जयसिंग राजपूत व निलेश चंद्रकांत ठाकूर यांनी वाद घालून चाकूसह गिटार मारून दुखापत केली होती. दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना शहर पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी आरोपींना भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मारहाणीत वापरण्यात आलेला चाकू तसेच गिटार पोलिसांनी जप्त केली आहे. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे करीत आहेत.