भुसावळात चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या खंडव्यातील ईसमास अटक

0

भुसावळ- शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गणेश बोअरींग सेंटरच्या दुकानाजवळ चोरीच्या उद्देशाने संशयास्पद हालचाली करणार्‍या शाहरुख खान वहिद खान उर्फ बत्ती (20, रा.खानसा वाडी बाबाच्या दर्ग्या मागे, खंडवा, जि.खंडवा, मध्यप्रदेश) यास बाजारपेठ पोलिसांच्या गस्ती पथकाने अटक केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक सुनील थोरात, नरेंद्र चौधरी, कृष्णा देशमुख, दीपक जाधव, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, सचिन चौधरी, योगेश माळी आदींनी केली.