अज्ञात वाहनाची धडक : भुसावळातील भावंडाचा करुण अंत

0

भुसावळ : पंक्चर झालेल्या जीपचे चाक बदलत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने धडक दिल्याने भुसावळातील शीख समाजातील दोघा भावंडाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवार, 4 रोजी दुपारी चार वाजता ही दुर्दैवी घटना भंडार्‍याजवळ घडली. दोघेही भावंडे बिलासपूर येथे भाड्याच्या जीपने जाताना ही घटना घडली. या घटनेने शहरातील शीख समाजबांधवांवर आठवडेभरात दुसर्‍यांदा संकट कोसळले आहे. गत आठवड्यातच सतनाम कौर सरजीत छाबडा या विवाहितेला कंटेनरने चिरडल्याने त्यांचा मृत्यू ओढवला होता. गुरमीत सिंह बल व जगरूप सिंह बल अशी मयत भावंडांची नावे आहेत.

भरधाव वाहनाच्या धडकेने मृत्यू
गुरमीत सिंह बल व जगरूप सिंह बल ही भावंडे बिलासपूर येथे कामानिमित्त जात असताना भंडार्‍याजवळ जीप पंक्चर झाल्याने टायर बदलत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने धडक दिल्याने दोघेही भावंडे जागीच ठार झाली. मंगळवार, 4 रोजी दुपारी चार वाजता हा अपघात झाला. मृत भावंडांच्या पश्चात आई. पत्नी, मुले असा परीवार आहे.