भुसावळात ट्रकवर कंटेनर आदळल्याने ट्रक चालकाचा मृत्यू ; वाहतूक ठप्प

0 1

भुसावळ- चटई घेऊन जाणार्‍या ट्रकवर समोरून येणारा कंटेनर धडकून झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील यावल रस्त्यावर गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. अपघातग्रस्त ट्रकमधील चालक जखमी होऊन अडकल्याने त्याला बाहेर काढण्यास प्रचंड अडचणी आल्या. दरम्यान, अपघातानंतर कंटेनरमधील चालकासह क्लीनर पसार झाले.

समोरासमोर झाली धडक
समजलेल्या माहितीनुसार, चटई घेऊन जाणारा ट्रक (एम.पी.09 के.डी.2601) भुसावळकडून यावलकडे जात असताना यावलकडून भुसावळकडे येणारा कंटेनर (एन.एल.01 एएल 8206) ची समोरासमोर धडक झाली. यावल रस्त्यावरील राहुल नगराच्या जवळ असलेल्या सब स्टेशनजवळ हा अपघात झाला. दरम्यान, रमेश पाल असे या अपघातातील मयत ट्रक चालकाचे नाव असल्याचे समजते.