भुसावळात दहावीची विद्यार्थिनी दुचाकी अपघातात जखमी

0 1

भुसावळ- दुचाकीने सायकलला धडक दिल्याने दहावीची परीक्षार्थी असलेली विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान जळगावरोडवरील काच बंगला परीसरात घडली तर अपघातामुळे या विद्यार्थिन्ी परीरक्षेलाही मुकावे लागल्याचे सांगण्यात आले. नेहा राजेश हिवरकर असे जखमी विद्यार्थीनीचे नाव आहे.

डोक्याला मार ; विद्यार्थिनी परीक्षेपासून वंचित
वीटभट्टीवर काम करून शिक्षण घेणारी विद्यार्थीनी नेहा राजेश हिवरकर (रा.मामाजी टॉकीज परिसर) ही सायकलीने भुसावळ हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर जात असताना शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जळगाव रोडवरील काच बंगला परीसरात दुचाकीने धडक दिल्याने विद्यार्थिनीच्या डोक्याला जबर मार बसला. परीसरातील नागरीकांनी तिला खाजगी रुग्णालयात हलवले असता तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने सहा टाके घेण्यात आले. विद्यार्थिनीची स्थिती परीक्षेला जाण्यासारखी नसल्याने तीला दहावीच्या पहिल्याच पेपरला मुकावे लागले. दरम्यान, या विद्यार्थिनीला उपचार करून घरी रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.