भुसावळात दोघांवर चाकूहल्ला

0

भुसावळ- भांडण सोडवल्याच्या कारणावरून भुसावळात दोघांवर चाकूहल्ला झाल्याची घटना 17 रोजी रात्री पंचशील नगरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध मंगळवारी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार प्रमोद मुरलीधर तायडे (पंचशील नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी शेख समीर शेख जाकीर याच्या गल्लीत कल्लू अजय बांगर याचे भांडण झाल्याने ते फिर्यादीने सोडवले होते. ते सोडवण्यात राग आल्याने आरोपी शेख समीर शेख जाकीर, शेख कैफ शेख जाकीर, शेख जाकीर व शेख मुमताज शेख जाकीर यांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली व शेख समीर शेख जाकीर याने चाकूने पाठीवर तसेच साक्षीदार मनोहर सुरळकर यांच्या छातीवर हल्ला केला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद कंक करीत आहेत.