गुन्हेगारी वाढली ; वाढत्या चोर्यांसोबत आता धूम गँग सक्रिय
भुसावळ- पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी विवाहितेच्या गळ्याल सव्वा लाखांची पोत लांबवल्याची घटना गुरूवारी सकाळी 10.30 ते 10. 45 वाजेच्या सुमारास शहरातील विकास कॉलनीत घडली. या घटनेने महिलांमध्ये खळबळ उडाली आहे. आधीच चोर्या-घरफोड्यांचा तपास संथगतीने सुरू असताना धुम स्टाईल चोर्या होवू लागल्याने नागरीकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी संतापाचे वातावरण आहे. शहरातील विकास कॉलनीतून पायी जाणार्या आशा भानुदास ठाकूर या विवाहितेजवळ पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोघा युवकांनी अडवले. काही कळायच्या आत चोरट्यांनी पोत लांबवली. विना क्रमांकाच्या दुचाकीवरून चोरटे अलगद पसार झाल्याने विवाहिता काही जवेळ भांबावली. बाजारपेठ पोलिस ठाण्यात आशा ठाकूर यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी नाकाबंदी केली मात्र यश आले नाही. सीसीटीव्हीच्या आधारावर चोरट्यांचा आता शोध घेतला जात आहे.