भुसावळात पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रभातफेरीने वेधले लक्ष

0

भुसावळ- सामाजिक बांधीलकी राबवण्याच्या दृष्टीने पोदार शाळेतील विद्यार्थांनी शुक्रवारी काढलेल्या प्रभात फेरीने शहरवासीयांचे लक्ष वेधले. यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रभात फेरीला प्रारंभ झाला. प्रभात फेरीत शाळेतील चौथी ते सहावीच्या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला. प्रभात फेरीला ए.एस.आय. राजेश वणीकर यांनी हिरवी झेंडी दिली. या कार्यक्रमात विद्यार्थांनी ‘भाकरीचे महत्व’या विषयावर नाटीका सदर करून शहरवावासीयांना ‘थिंक ग्लोबल इट लोकल’ असा संदेश दिला. या पथनाट्यात माधव बाविस्कर, संकेत सोनवणे, हर्षवर्धन ताडा, दिव्यांश नारखेडे, विशाल गायन, सोहम बगमारे, अनुष्का पाटील, मानसी खाचणे, गौरी वारके, हरजस सिंग छाब्रा, यश सपकाळे, आयुष गुप्ता, सिद्धेश पाटील यांचा सहभाग होता. वाटसरूंसाठी सेल्फी कॉर्नर व पौष्टिक असणारे फळे, रस यांचा मोफत स्टॉल लावण्यात आला. जंक फूड शरीराला कसे घातक आहे याची माहिती प्राचार्य विनयकुमार उपाध्याय यांनी या प्रसंगी शहरवासीयांना दिली. सामाजिक कर्तव्याची जाणीव निर्माण करणे, सामाजिक बांधीलकी जोपासणे हे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अन्नदाता शेतकर्‍यांचे आभार मानणण्यात आले तर अन्नाची नासाडी न करता चांगले व सकस अन्न खाण्याची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे व्यवस्थापक रामदास कुलकर्णी, सीमा पाटील, रमेश धाकपडे, ज्योती अदुर्ती, युगंधरा सपकाळ, कल्पिता तांदुलवाडीकर, प्रकाश दलाल तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अथक परीश्रम घेतले.