भुसावळात बी.झेड.उर्दू हायस्कूलचे दोघे कॉपी बहाद्दर डिबार

0

भुसावळ- शहरातील खडका रोडवरील बी.झेड उर्दू हायस्कूलच्या केंद्रावर दहावी परीक्षेतील इंग्रजी विषयाचा पेपर सुरू असताना डाएटचे अधिव्याख्याता डॉ.राजेंद्र महाजन यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी अचानक भेट देत तपासणी केली. यावेळी दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याने त्यांना डीबार करण्यात आले. इंग्रजी विषयासाठी चार हजार 25 विद्यार्थी प्रविष्ट असताना मंगळवारी 51 विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याने केवळ तीन हजार 974 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.