भुसावळात भारिपची बैठक : पक्ष संघटन वाढवण्यावर जिल्हाध्यक्षांचा भर

0

भुसावळ- भारिप बहुजन महासंघाची जिल्हा आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात झाली. प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी मार्गदर्शन करीत पक्षाची ध्येय धोरणे मांडत आगामी काळात पक्ष आणखीन मजबूत करण्यासाठी गावो-गावी शाखा उद्घाटनासह पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. प्रसंगी युवा जिल्हा अध्यक्ष विजय पवार, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश ईखारे, विश्‍वनाथ मोरे आदींनी मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा सचिव संजय सुरडकर, जिल्हा संघटक सचिव प्रवीण आखाडे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष महेश तायडे, बाळू शिरतुरे, संजय कांडेलकर, बोदवड तालुकाध्यक्ष सुपा निकम, यावल तालुकाध्यक्ष दीपक मेघे, युवा तालुकाध्यक्ष सचिन बार्‍हे, समय्यक विद्यार्थी आंदोलनाचे कौस्तुभ शिंदे, भुसावळ युवा शहराध्यक्ष विद्यासागर खरात, भुसावळ तालुकाध्यक्ष अ‍ॅड.मनोहर सपकाळे, नीलेश जाधव, तुषार जाधव, संगीता भामरे, सरला तायडे, पंचशीला जाधव, अलका सुतार, स्वप्नील इंगळे, इब्राहीम खान, फिरोज शेख, सोनू बनसोडे, महेंद्र मेढे, बबन कांबळे, रूपेश साळुंके, संतोष सोनवणे, आशाबाई चौथमल, नंदा तपासे, मनीषा साळवे, पूनम किरंगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सारीपुत्र गढे तर आभार प्रवीण आखाडे यांनी मानले.