भुसावळात महिलेचा विनयभंग करून मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ- घराबाहेर सुरू असलेल्या महिलांच्या गप्पांमध्ये हसल्याचा राग आल्याने महिलेलाच मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्या आला. पीडीत 35 वर्षीय महिला शनिवारी रात्री 11.30 वाजता घराच्या बाहेर गप्पा करीत बसली असताना रस्त्याने जाणारे रायसिंग सरदार पंडीत, गुड्डू पंडीत, गोलू पंडीत आणि बेबी पंडीत यांनी आपल्यालाच ही महिला हसली, असा संशया आल्याने पीडीत महिलेस चापटा-बुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण करून अश्लिल शिवीगाळ करण्यात आली. बाजारपेठ पोलिस ठाण्यात चारही जणांविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग पुढील तपास करीत आहे.