50 लाखांच्या टायर-ट्यूबची चोरी : दोघे आरोपी जाळ्यात

0

धुळे : ट्रक चालकाला थंड पेयातून गुंगीचे औषध देत 50 लाख 71 हजारांचे 171 नग रबरी टायर करीता ट्यूब लांबवण्यात आल्याची घटना 11 महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. रवीराज युवराज फुलमाळी (29, रा़ कडोदरा, ता़ पलासना, जि.सुरत) आणि प्रवीण आधार शिंपी (28, रा़ माऊलीनगर, वरखेडी रोड, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

11 महिन्यानंतर गुन्हा उघडकीस
राजस्थान राज्यातील भिवाडी येथील एका कंपनीतून जेसीबी व हार्वेस्टर मशीन करीता उपयोगात येणारे टायर्स व ट्यूबने भरलेला ट्रक (एच.आर 38 आर.0555) हा पुणे येथे माल देण्याकरीता निघाला असताना 8 मे 2019 रोजी रात्री हा ट्रक शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील तपासणी नाक्यावर आल्यानंतर एकाने लिफ्ट मागितली व त्या अनोळखीने चालकाला थंडपेयमधून गुंगीचे औषध दिल्यानंतर या ट्रकमधून 171 नग रबरी टायर करीता ट्यूब असा सुमारे 50 लाख 71 हजाराचा ऐवज लंपास झाला होता.