भुसावळात राष्ट्रभाषेच्या परीक्षेला 50 विद्यार्थ्यांची दांडी

0 1

भुसावळ- राष्ट्रभाषा हिंदी विषयाच्या पेपराला गुरुवारी शहरात तब्बल 50 विद्यार्थ्यांनी दांडी मारली तर कॉपीविषयी ओरड होत असलीतरी आलेल्या भरारी पथकाला मात्र कॉपी न सापडल्याने एकाही विद्यार्थ्यावर कारवाई झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. हिंदी विषयाच्या पेपरासाठी गुरूवारी तीन हजार 57 परीक्षार्थीपैकी 50 परीक्षार्थींनी दांडी मारली. उपशिक्षणाधिकारी कीशोर पाटील यांच्या भरारी पथकाने शहरातील डीएल हिंदी हायस्कूलला भेट दिली मात्र एकही कॉपी केस मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.