भुसावळात रीक्षा चालकावर चाकू हल्ला ; आरोपीला अटक

0

प्रेम प्रकरणाची माहिती कुटुंबियांना दिल्याच्या संशयावरून वाद विकोपाला

भुसावळ- प्रेम प्रकरणाची माहिती कुटुंबियांना दिल्याच्या संशयातून रजा टॉवरजवळ रीक्षा चालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत अल्पवयीन आरोपीच्या डीबीच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या

प्रेम प्रकरणाची माहिती दिल्यावरून चाकू हल्ला
तक्रारदार तथा रीक्षा चालक ईस्माईल मो.आलम आयान कॉलनी (न्यू ईदगाह मैदान, भुसावळ) हे मित्र मो.ईसराईल मो.आलम, अफजल रमतुल्ला व बबलूसोबत रजा टॉवरजवळ गप्पा करीत असताना मुस्लीम कॉलनीतील रहिवासी असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीने येत आपल्या प्रेमसंबंधाची माहिती कुटुंबियांना का दिली? असा जाब विचारत रीक्षा चालक ईस्माईल मो.आलम यांच्या छातीवर तसेच उजव्या हातावर चाकू मारला तसेच शिवीगाळ करून पळ काढला. चाकू हल्ल्यात ईस्माईल हे रक्तबंबाळ झाल्यानंतर डॉ.राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारार्थ गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले. ईस्माईल यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात भादंवि 307 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

काही तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या
गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांना घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. पोलिसांना तातडीने आरोपीला अटक करण्याच्या त्यांनी सूचना केल्यानंतर बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार, शहरचे बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजेश शिंदे, उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग, मनोज ठाकरे, कॉन्स्टेबल विकास सातदिवे यांनी आरोपीस अटक केली. दरम्यान, अटकेतील आरोपी हा अल्पवयीन असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.