भुसावळात रेल्वेच्या मुख्य अभियंत्यांची भेट : विविध कामांची पाहणी

0

भुसावळ- रेल्वे प्रिसींपल चीफ इंजिनिअर एस.के.अग्रवाल (मुंबई) यांनी भुसावळ रेल्वे विभागाला बुधवारी भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी विविध विभागाचे इन्स्पेक्शन केले. दुपारी त्यांनी ट्रॅक सुपरवायर, पीडब्ल्यू आय , आयडब्ल्यूओ, ब्रिज इन्स्पेक्टर, सिव्हील इंजिनिअरींग हेड आदींसह विविध विभागातील प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेवून काही मार्गदर्शक सूचनाही केल्या. डीआरएम आर.के.यादव यांच्यासह त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली तसेच दुपारी चार वाजेच्या सुमारास लोहमार्ग पोलीस ठाण्यामागील बाजूची पाहणीदेखील केली.