भुसावळात शंटींगदरम्यान मालगाडीचे तीन डबे रूळावरून घसरले

0 1

जी.एम.दौर्‍याप्रसंगी अपघात ; दोन खांबांसह सिग्नल यंत्रणेचे नुकसान

भुसावळ- मध्य रेल्वेचे जी.एम. भुसावळ दौर्‍यावर असताना रेल्वेच्या सीवायएम कार्यालयासमोर शंटींग करणार्‍या मालगाडीचे तीन डबे घसरून रेल्वे रूळावरून घसरण्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर परीणाम झाला नसलातरी रेल्वे रूळासह मुख्य विद्युत वाहिनीचे दोन खांब व सिग्नल यंत्रणेचे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. जी.एम. दौर्‍यामुळे अधिकारी व्यस्त असल्याने तातडीने घटनास्थळी अधिकारी पोहोचले नसलेतरी कर्मचार्‍यांनी मात्र धाव घेवून अत्याधूननिक जॅकच्या सहाय्याने रेल्वे डबे रूळावरून उचलण्यात यश मिळवले.

शंटींग करताना रेल्वे अपघात
रेल्वे यार्डातील मालगाडीचे शंटींग करीत असताना तीन डबे रूळाखाली घसरले सुदैवाने यामुळे वाहतुकीवर कुठलाही परीणाम जाणवला नाही. या अपघातामुळे मुख्य वीज वाहिनी ओएचईचे दोन खांब व सिग्नलच्या एका खांबाचे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.