भुसावळात शुक्रवारी ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाचे लोकार्पण

0

भुसावळ- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक स्व. शांतीलाल जवरीलाल सुराणा यांच्या पुण्यस्मराणानिमित्त समर्पण प्रतिष्ठान व सुराणा परीवारातर्फे शहरात शुक्रवार, 15 रोजी दुपारी साडेचार वाजता ‘माणुसकिची भिंत’या उपक्रमाचे लोकार्पण जामनेर रोडवरील मुन्सीपल हायस्कूलजवळ होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताचे प्रांत प्रचारक रामानंद काळे यांच्या हस्ते या उपक्रमाचे लोकार्पण होणार आहे. शहरात ‘माणुसकीची भिंत’ हा पहिला उपक्रम राबवला जात आहे. भुसावळकरांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन जयंतीलाल सुराणा, महेंद्रकुमार सुराणा, नितीन सुराणा यांनी केले आहे.