भुसावळात श्री गणेश कॉम्प्युटर्स नेट बँकींगची कामे विना कमिशन करणार

0

रेल कामगार सेनेचे अध्यक्ष ललितकुमार मुथा यांच्या उपस्थितीत शुभारंभ

भुसावळ : शहरातील श्री गणेश कॉम्प्युटरमध्ये नेट बँकींगची कामे कुठलेही कमिशन न घेता केली जाणार आहेत. कोरोनामुळे संचारबंदी सुरू असून बँकांमध्येही नागरीकांची होणारी गर्दी पाहता नागरीकांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष ललितकुमार मुथा यांच्या उपस्थितीत 3 रोजी या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

नागरीकांना मिळणार दिलासा
सर्व बँकेतून पैसे काढणे, जमा करणे, लाईट बिल भरणे, तत्काळ पैसे पाठविणे, फोन बिल भरणे, बँकेत खाते उघडणे आदी कामे श्री गणेश कॉम्प्युटरमध्ये होणार आहेत. यावेळी श्री गणेश कॉम्प्युटरचे संचालक अमोल माळी, सत्यजीत वाणी व एमओएच कर्मचारी रणजीतसिंग चौधरी हे उपस्थित होते. कोरोनाच्या परीस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री गणेश कॉम्प्युटरचे संचालक अमोल माळी यांनी जनसेवा म्हणून संकट टळेपर्यंत सर्व नेट बेंकिंगचे व्यवहार विना कमिशन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरीकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ललितकुमार मुथा यांनी केले आहे. दरम्यान, नागरीकांनी संपर्कासाठी जामनेर रोड, लक्ष्मी नगर, प्रिमीअर हॉटेलसमोर येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल 9766388471, 9657075826 वरही संपर्क साधता येणार आहे.