भुसावळात सत्ताधार्‍यांच्या वॉर्डातच पालिका दिव्यांचा अंधार

0

भुसावळ- सत्ताधारी नगरसेवक पिंटू (महेंद्रसिंग) ठाकूर यांच्या प्रभागातच सुमारे महिनाभरापेक्षा अधिक काळापासून हायमास्ट व पोलवरील एलईडी बंद असतानाही संबंधित दखल घेत नसल्याने त्यांनी या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वर्षभरापूर्वी पालिकेने 50 टक्के वीज बिलात बचत करणारे एलईडी दिवे शहरात बसवले होते तर दिवा बंद पडल्यानंतर अवघ्या 24 तासात तो बदलण्याची ग्वाही सत्ताधार्‍यांनी दिली होती मात्र दोन लाख लोकसंख्येच्या शहरासाठी अवघा एकच वायरमन संबंधित ठेकेदारांनी नियुक्त करीत संतापात भर घातली आहे.

यंत्रणा आहे कुठे ?
संबंधित ठेकेदार व वायरमन आमचा फोन उचलत नाही. एसएमएस करूनही उपयोग होत नाही. जनता आम्हाला 24 तासात तुम्ही एलईडी बदलून देणार होते याबाबत जाब विचारत होते शिवाय यासाठी पालिकेत स्वतंत्र यंत्रणाही उभी केली जाणार होती ? ती आहे कुठे? असा प्रश्‍न पिंटू ठाकूर यांनी उपस्थित केला.