भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी परीसरात अन्न-धान्याचे वाटप

0

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या संकटात मदतीसाठी भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी परीसरात गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. 3 रोजी ऑर्डनन्स फॅक्टरी एम्प्लाइज क्रेडिट को.सोसायटीचे चेअरमन सच्चानंद गोधवानी व हितचिकांनी गरीब परीवारांना तसेच ठेकेदार तत्वावर काम करणार्‍या 90 परीवारांना पाच किलो तांदूळ, एक किलो दाळ, एक किलो तेल, पाच किलो गव्हाचे पीठ, हळद, मिर्ची तसेच धने पावडरचे वाटप केले. याप्रसंगी एस.के.मेहता, नवल पाटील, किशोर चौधरी, एम.एस.राऊत, प्रकाश कदम, प्रकाश नेमाडे, नीलेश पाटील, पंकज पाटील, सुनील सोनवणे, सुभाष पाटील, महेंद्र साठे, संजय अहिरे, राम जाधव, गणेश सोनवणे, तरुण तेहलानी, प्रकाश पाटील व सोसायटी कर्मचारी उपस्थित होते.