भुसावळ कृउबात तीन संचालकांची बिनविरोध निवड

0

कैलास पाटील, विजयकुमार लोकवाणी व प्रतिभा पाटील यांची वर्णी

भुसावळ- कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा आज बुधवार, 27 रोजी झाली. त्यात रीक्त झालेल्या व्यापारी मतदार संघातून स्वीकृत संचालकपदी विजयकुमार चंदूलाल लोकवाणी व ग्रामपंचायत मतदार संघातून प्रतिभा वासुदेव पाटील तसेच पणन मतदार संघातून कैलास सुकलाल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सर्व नूतन संचालकांचे कृउबा सभापती सचिन संतोष चौधरी व मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील, उपसभापती अशोक पाटील, संचालक गजानन सरोदे, सुभाष पाटील, राजेश जोशी, होमा पाचपांडे, नारायण सपकाळे, सुनील महाजन, डिगंबर कोल्हे, कैलास गव्हाणे, प्रमिला पाटील, इंदूमती महाजन, कोकिळा पाटील, सचिव एन.आर.पाटील, भुसावळ फळ भाजी अडत असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र चौधरी, उपाध्यक्ष उमेश चौधरी, सचिव निलेश माळी, दोधु माखीजा, किशोर बजाज, रवी माखीजा, अशोक लोकवाणी, प्रमोद माळी, प्रवीण चौधरी, सुभाष चौधरी, नरेश जाधव, किशोर चौधरी, योगेश चौधरी, संजीव सरोदे, किरण पाटील, विजय बाविस्कर, शेख इरफान, प्रशांत चौधरी, धीरज मराठे, हेमंत भारंबे आदी उपस्थित होते.