भुसावळात गोळीबार : सात जणांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळातील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत : चौघा संशयीतांना चौकशीकामी पोलिसांनी घेतले ताब्यात

भुसावळ : शहरातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा गोळीबारामुळे चर्चेत आली आहे. लॉण्ड्रीचा पत्ता माहित नाही, असे सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून 19 वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना रेल्वे रुग्णालयाजवळील ख्रिश्‍चन कब्रस्थानजवळ गुरुवारी रात्री साडेसात ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. गोळीबारात आदित्य संजय लोखंडे (19, न्यू आंबेडकर नगर, भुसावळ) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार प्रकरणी शहर पोलिसात सात संशयीतांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून चार संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी संशयीतांची कसून चौकशी केली.

लॉण्ड्रीचा पत्ता न सांगितल्याने गोळीबार
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आदित्य संजय लोखंडे (19, न्यू आंबेडकर नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, संशयीत आरोपी चिन्ना याने गुरुवारी रात्री फोन करून रेल्वे रुग्णालयाजवळील कब्रस्थानजवळ बोलावले व ‘सोनू लॉण्ड्री कहाँ’ असे विचारले मात्र मला काय माहित, असे उत्तर दिल्याचा राग आल्याने सातही आरोपींनी चापटा बुक्क्यांनी तसेच फायटरने मारहाण केली तसेच आरोपी क्रमांक 1 ते 3 यांनी गावठी पिस्तुलातून आळी-पाळीने गोळी झाडल्याने गालावर, डाव्या कानाच्या मागे डोक्यावर व डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच फिर्यादीच्या ताब्यातील आयफोन कंपनीचा मोबाईल व आपाची कंपनीची दुचाकी (एम.एच.19 ए.झेड.5890) लांबवून पोबारा केला.

गोळीबारानंतर शहर उडाली खळबळ
शहर पोलिस ठाणे हद्दीतील रेल्वे रुग्णाजवळ गोळीबार झाल्याची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी घटनास्थळ गाठून नेमक्या घटनेची माहिती जाणून घेतली तर शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांनी गोदावरी रुग्णालयात जावून जखमींकडून हल्ल्याबाबत माहिती जाणून घेतली.

सात आरोपींविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा
शहर पोलिात आदित्य संजय लोखंडे या जखमीच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी आतीष खरात, हंसराज, गोलू उर्फ राजन खरात, चिन्ना, सुरज, गोविंदा, कपिल कासे (सर्व रा.भुसावळ, पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध भाग पाच, गुरनं.377/2020, भादंवि 307, 395, 143, 147, 148, 149, 323, 504, आर्म अ‍ॅक्ट 3/25, 3/27, मुंबई पोलिस अ‍ॅक्ट 37 (1)(3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.