भुसावळ डीआरएम यांनी नांदुरासह मलकापूर रेल्वे स्थानकाचे केले निरीक्षण

0

भुसावळ : भुसावळचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी बुधवारी नांदुरा व मलकापुर रेल्वे स्थानकाचे निरीक्षण केले. नांदुरा स्टेशनच्या निरीक्षणादरम्यान स्टेशन परीसर, मुख्य गेट, स्टेशन इमारत सौंदर्यीकरण करण्याबद्दल त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांना सूचना केल्या. यावेळी नवीन तयार करण्यात येणार्‍या पादचारी पुलाचे निरीक्षण करण्यात आले तसेच चारचाकी गाड्यांसाठी व टू व्हीलर पार्किंगसाठी जागा आणि बाहेरच्या परीसरात तसेच बाहेर जनरल शौचालय बांधण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

मलकापूरात नवीन प्रतीक्षालय बनणार
मलकापूर स्टेशनच्या पाहणीदरम्यान डीआरएम यांनी स्टेशन परीसराची पाहणी करीत प्रवाशांसाठी डाउन प्लेटफार्मवर एक प्रतीक्षालय नवीन बनवण्याच्या सूचना केल्या तसेच गुड्स शेडमध्ये समोरील पडलेल्या भिंतीला दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना केल्या तसेच नवीन दादर्‍याची पाहणी केली. ट्रेन कोच इंडिकेटरचे डिस्प्ले नांदुरा तसेच मलकापूर रेल्वे स्थानकावर लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. या निरीक्षणात डीआरएम विवेककुमार गुप्ता, वरीष्ठ मंडथ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितीज गुरव, वरीष्ठ मंडळ अभियंता (पूर्व) चौहान, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी व स्टेशन प्रबंधक उपस्थित होते.