भुसावळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा मीच अध्यक्ष -बाळा सोनवणे

0

भुसावळ- प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा आपण कायदेशीर अध्यक्ष असल्याचे पत्रक बाळा डिगंबर सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 23 रोजी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आपली निवड करण्यात आली आहे. प्रत्येक वेळी नवीन अध्यक्ष व्हावा ही समाजाचा प्रथा असल्याचे सोनवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.