भुसावळ तालुक्यातील कोतवाल भरतीचे आरक्षण जाहीर

0

भुसावळ- तालुक्यातील बेल्हाळे, फुलगाव, शिंदी व ओझरखेडा या चार गावांतील कोतवाल भरतीसाठी बुधवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. वेल्हाळे येथे सर्व साधारण, फुलगाव सर्वसाधारण महिला, शिंदी येथे अनुसूचीत जमाती (एस.टी.), ओझरखेडा विमुक्त जमाजी अ असे आरक्षण सोडत निघाली. नायब तहसीलदार (महसूल) ज्ञानेश्वर सपकाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संगीता पांढरे, कोषागार अव्वल कारकून सविता दिनाथ, सुयोग पाटील यांची उपस्थिती होती. साबीर खान (वय 14) या चिमुकल्याच्या हस्ते आरक्षण सोडतीच्या चिठ्या काढण्यात आल्यात.