भुसावळ नगरपालिका निवडणूकीत खोटे प्रमाणपत्र ; चौकशीचे निवडणूक आयोगाचे आदेश

0

भुसावळ- भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीत अनिता सोनवणे यांनी मागासवर्गीय प्रवर्गातून नामनिर्देशन सादर न करता विशेष मागास प्रर्वगातून उमेदवारी दाखल केली होती. या संदर्भात केदारनाथ वामन सानप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती मात्र तक्रार अर्जाची दखल न घेतल्यामुळे त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सावंत यांनी 24 एप्रिल 2018 रोजी जळगाव जिल्हाधिकारी यांना नियमानुसार आवश्यक ती उचीत कार्यवाही करून तक्रारदारास परस्पर कळवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान काय कारवाई होते ? याकडे तक्रारदाराचे लक्ष लागले आहे.