भुसावळ-नरखेड पॅसेंजरऐवजी धावणार भुसावळ-बडनेरा मेमू

0

केवळ आठ कोच असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची भीती

भुसावळ- भुसावळ-नरखेड धावणारी पॅसेंजर बंद करून त्याऐवजी तेथे 1 फेब्रुवारीपासून भुसावळ-बडनेरा मेमू ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. बडनेरा येथून पुढे ही मेमू नरखेडपर्यंत धावणार असलीतरी प्रवाशांना मात्र या गाडीतच बसून पुढील प्रवास करता येणार आहे. दरम्यान, असे असलेतरी तरी मेमूला केवळ आठ डबे जोडण्यात आल्याने प्रवाशांसह चाकरमान्यांची मोठी गैरसोय होण्याची भीती आहे.

नरखेड पॅसेंजरऐवजी धावणार मेमू
यापूर्वी भुसावळ-बडनेरा दरम्यान 51183 व 51184 अप-डाउन भुसावळ-नरखेड पॅसेंजर धावत होती मात्र आता त्याऐवजी मेमू ट्रेन धावणार आहे. या गाडीचा क्रमांक आता बदलला असून डाऊन 61101 भुसावळ-बडनेरा मेमू ट्रेन दररोज सकाळी साडेसहा वाजता सुटल्यानंतर सकाळी 11.25 वाजता बडनेराला पोहोचेल तर अप 61102 बडनेरा-भुसावळ मेमू ट्रेन 3 फेबु्रवारीपासून दुपारी 1.30 वाजता सुटेल. दरम्यान, बडनेरापर्यंत मेमू धावणार असलीतरी नरखेडला देखील हीच मेमू धावणार असून त्यासाठी मात्र या गाडीला दुसरा क्रमांक देण्यात आला आहे तर प्रवाशांना नरखेड जाण्यासाठी गाडी बदलायची गरज नसून याच मेमून बसून पुढील प्रवास करावयाचा असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. बडनेरा येथून नरखेड जाण्यासाठी याच मेमूला गाडी क्रमांक 61103 बडनेरा-नरखेरड हा क्रमांक असून दुपारी 12.15 वाजता ती बडनेरा येथून सुटणार आहे तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक अप 61106 अप हा क्रमांक असून सकाळी 9.15 वाजता ही सुटल्यानंतर बडनेरा येथे दुपारी 1.10 वाजता तिचे आगमन होईल व त्यानंतर ही मेमू ट्रेन 61102 या क्रमांकाने पुन्हा भुसावळ जंंक्शन स्थानकावर येणार आहे.