भुसावळ-नागपूर पॅसेंजर 9 ते 21 फेब्रुवारीदरम्यान रद्द

0

भुसावळ- मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात प्लॅटफार्म क्रमांक एक व दोनच्या कामांसाठी भुसावळ-नागपूर पॅसेंजर 21 दिवस रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे. अप 51286 नागपूर-भुसावळ पॅसेंजर तसेच डाऊन 51285 भुसावळ-नागपूर पॅसेंजर 9 ते 29 फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे. दरम्यान अप 51262 वर्धा-अमरावती पॅसेंजर तसेच डाऊन 51261 अमरावती-वर्धा पॅसेंजर 15, 16, 22, 23 तसेच 29 फेब्रुवारी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी याबाबत नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.