भुसावळ न्यायालयाबाहेर शहर पोलिसांकडून बॅरीकेटींग

0

अवैध विक्रेत्यांना दुकाने लावण्यास मज्जाव ; तर पोलिसांकडून कारवाई

भुसावळ- यावल रस्त्यावरील अतिरीक्त सत्र न्यायालयाबाहेर बेशिस्तपणे खाद्य पदार्थ विक्रेत्यांसह अन्य विक्रेते लोटगाड्या लावत असल्याने पक्षकारांना न्यायालयात जाण्यास अडचण निर्माण झाली होती शिवाय या विक्रेत्यांमुळे वाहनधारक रस्त्यावरच वाहने लावत असल्याने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आणि शहर वाहतूक शाखेचे सहा. निरीक्षक दीपक गंधाले यांनी विक्रेत्यांच्या बैठक घेवून गुरूवारपासून सकाळी दहा ते सायंकाळी दरम्यान दुकाने लावण्यास मज्जाव केला होता शिवाय गुरूवारपासून आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. पोलिसांच्या तंबीनंतर गुरूवारी न्यायालयाच्या परीसरात दुकाने लावली नाहीत मात्र पोलिसांनी देखील येथे सतर्कता म्हणून बॅरीकेटींग लावून विक्रेत्यांना फिरकू दिले नाही.

इशार्‍यानंतर लागले नाही एकही दुकान
भुसावळ न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर न्यायालयीन वेळेत खाद्य पदार्थ, रस विक्रेत्यांसह अन्य विक्रेते व्यवसाय करीत असल्याने न्यायालयात येण्या-जाण्यास अडचणी यत होत्या शिवाय विक्रेत्यांच्या गाड्या राहात असल्याने न्यायालयात येणार्‍या पक्षकारांना त्यांची वाहने थेट न्यायालयाच्या आवारात लावावी लागत असल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. पोलिस प्रशासनाने बुधवारी न्यायालयाच्या बाहेर व्यवसाय करणार्‍या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची बैठक घेवून न्यायालयीन वेळेत कुणीही गाड्या लावू नये, सायंकाळी सहानंतर व्यावसायीकांनी त्यांची दुकाने लावावीत अशा सूचना केल्या होत्या शिवाय गुरुवारी आदेशाचे उल्लंघण केल्यास साहित्य जप्तीचा इशाराही दिला होता. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी न्यायालयीन वेळेत एकानेही दुकान लावले नाहीत तर पोलिस प्रशासनानेदेखील या परीसरात बॅरीगेटस लावल्याचे शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले म्हणाले. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे जुबेर शेख, राजकिरण झाल्टे, शहर वाहतूक शाखेचे चालक सुनील शिंदे उपस्थित होते.