भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकांवर कचरा आढळल्यास करा तक्रार

0

रेल्वे प्रशासन घेणार दखल :  व्हाटस्अ‍ॅप क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन

भुसावळ- भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकांवर दिवसभरात शेकडो गाड्या थांबून रेल्वे प्रवाशांची वाहतूक करतात मात्र अनेकदा स्वच्छता केल्यानंतर काही प्रवाशांकडून रेल्वे स्थानकावर कचरा टाकला जात असल्याने स्थानकाचे नाव बदनाम होते. रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत गांभीर्याने दखल घेतली जात असलीतरी काही ठिकाणी मात्र स्वच्छता होत नसल्याचे प्रकारही दिसून येतात. या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकावर जेथे कुठे अस्वच्छता दिसत असल्यास रेल्वे प्रवाशांसह नागरीकांना व्हॉटसअ‍ॅपवर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. या माध्यमातून कचर्‍याची लागलीच विल्हेवाट लावता येणार आहे. भुसावळ विभागातील ज्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना कचरा आढळल्यास त्यांनी मोबाइल क्रमांक 9503011972 या व्हाट्सअ‍ॅप नंबरवर स्टेशनचे नावं आणि जागेच्या विवरणासह कचर्‍याचा फोटो पाठवल्यास रेल्वे विभाग तातडीने दखल घेणार असल्याचे भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव, एडीआरएम मनोज सिन्हा, सिनी.डीसीएम सुनील मिश्रा यांनी कळवले आहे.