भुसावळ विभागात बंदला संमिश्र प्रतिसाद

0

शाळा, महाविद्यालयासह एस.टी.बसेस व हॉस्पीटल, मेडिकल आदी अत्यावश्यक सेवा वगळल्याने दिलासा : भुसावळमध्ये शांततेत बंदचे आवाहन : सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याला तीव्र विरोध ः यावलमध्ये भुसावळ टी पॉईंटवर रस्ता रोकोने वाहतूक खोळंबली

भुसावळ : सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. भुसावळ विभागातही या बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. भुसावळ शहरात दुपारपर्यंत काही भागात दुकाने बंद ठेवण्यात आली तर दुपारनंतर सर्वत्र दुकाने उघडण्यात आली होती. बंदमध्ये शाळा, महाविद्यालय, एस.टी.बसेससह हॉस्पीटल, मेडिकल आदी अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. रावेरमध्ये बंदला पाठिब्यांबाबत निवेदन देण्यात आले तर मुक्ताईनगरसह बोदवडला बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला तर यावलमध्ये काही वेळ रस्ता रोको करण्यात आला.

भुसावळात बंदला संमिश्र प्रतिसाद
भुसावळ- शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला. सराफ बाजार व मॉडर्न रोडवरील दुकाने, अप्सरा चौकातील हातगाडी चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला.पदाधिकार्‍याकडून व्यावसायीकांना दुकाने बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली. बंदच्या पार्श्वभुमीवर शहरातील विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला. शहर पोलिस ठाण्याच्या आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची गस्त सकाळपासून सुरूझाली तर आठपासून सुरू करण्यात आली तर विविध ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट लावण्यात आले होते. शहरातील सराफ बाजार, मॉडर्न रोड, आठवडे बाजार, वसंत टॉकीज परीसरातील काही दुकाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील दुकाने दुपारपर्यंत बंद राहिली तर दुपारनंतर मात्र दुकाने पूर्ववत सुरू झाली.

प्रांताधिकार्‍यांना निवेदन
वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारकडून लागू करण्यात येत असलेला कायदा रद्द करावा, तहसील कार्यालयाच्या बाहेर साखळी उपोषण सुरू असतांनाही तहसीलदार यांनी उपोेषणार्थीना भेट दिली नसल्याने उपोषणकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, महासचिव दिनेश इखारे, एमआयएमचे फिरोज शेख, संविधान बचाव समितीचे सलीम चुडीवाले, नगरसेवक उल्हास पगारे, राजेद्र सपकाळे, गणेश सपकाळे, संजय सुरडकर, रूपेश साळुंखे, साबीर शेख, मुन्ना सोनवणे, वंदना सोनवणे, सिध्दार्थ सोनवणे, सुदाम सोनवणे, राजू सपकाळे, निलेश जाधव, संगीता भामरे आदी उपस्थित होते.

यावल शहरात रस्ता रोको
यावल- केंद्र शासनाने नुकताच मंजूर केलेल्या सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी भुसावळ टी पॉईंटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना निवेदन सादर करण्यात आले. शहराचा शुक्रवारी आठवडे बाजार असल्याने बाजारावर बंदचा कोणताही परीणाम जाणवला नाही. जिल्हाध्यक्ष सचिन बार्‍हे व भीम टायगर ग्रुपचे प्रदीप वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सचिन बारी, आकाश तायडे, राजेश गवळी, दीपक मेघे, अतुल तायडे, बाळा तायडे, ईश्वर तायडे, किरण तायडे, नितीन तायडे, चंदू पारधे, अमोल तायडे, भगवान मेघे, दिवाकर इंगळे, योगेश तायडे, किशोर सोनवणे, रींकी तायडे, गोलू तायडे, सचिन तायडे, भागवत तायडे, सुहास वानखेडे, नदीम खान यांनी भाग घेतला.

रावेरात तहसील प्रशासनाला निवेदन
रावेर- वंचित बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. रावेर शहरात मात्र बंद पाळण्यात आला नसलातरी रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघातर्फे रावेर नायब तहसीलदार संजय तायडे यांना बंदला पाठिब्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. या बंदला रावेर तालुका काँगसे पक्ष, ऑल इंडिया मसजिद ए इलेहादुल मुस्लीमिन, रावेर तसेच मुस्मीम पंच कमेटीने बंदला पाठिाबा दर्शवला. निवेदनावर वंचित बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मुस्लीम पंच कमिटीचे शे.गयास शे.रशीद एम.आय.एम.चे शे.वसीम, राजुभाऊ खिरवडकर, नुरा तडवी, वंचितचे सुरेश अटाकाळे, माजी नगरसेवक महेंद्र गजरे, राहुल डी.गाढे, विनोद तायडे, अशोक शिरतुरे, दौलत अढांगळे, नितीन तायडे, भीमराव तायडे, सै.आरीफ सै.मोहम, शे.नासीर शे.कालु, शे.रफीक, गौतम अटकाळे, युसुफ खान, विकास सवर्णे, शे.जावेद, रवींद्र भिल्ल आदींची नावे आहेत.

बोदवडला कडकडीत बंद
बोदवड- महाराष्ट्र बंदला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. शहरातील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे बंदला पाठिंबा दर्शवला. भाजपा सरकारने संमत केलेले कायदे हे आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीय यांच्याविरुद्ध आहेत असल्याचे मत जामा मशिदीचे इमाम अमीन पटेल म्हणाले. काँग्रेसचे नगरसेवक डॉ.सुधीर पाटील, दिलीप पाटील, विनोद माईकर, शे.महेबूब शे.चांद, राष्ट्रवादीचे प्रमोद धमोडे, आनंदा पाटील, शिवसेनेचे कलीम भाई, शेतकरी शेतमजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, संभाजी ब्रिगेडचे संजय पाटील, अनंता वाघ, जमिया तुलमा-ए हिंदचे मौलाना अमीन इशाती सह शेकडो मुस्लिम समाजातील तरुण बंदमध्ये सहभागी झाले. बंद यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे बोदवड तालुक्यातील सुपडा निकम, महेंद्र सुरळकर, शेख सलीम शेख खलील, गोपीचंद सुरवाडे, विनोद पाडर, नागसेन सुरळकर, सुरेश तायडे, गोविंदा तायडे, शाहरुख शहा, सद्दाम कुरेशी, मौलवी अमीन, बबलू हाफिज, महेमुद शेख, अक्रमशेख, बबन बोदडे, सुभाष इंगळे, जितेंद्र सूर्यवंशी, शांताराम मोरे, संजय गायकवाड, राजुभाई मॅकेनिक, रफा भाई कुरेशी परीश्रम घेतले.

मुक्ताईनगर कडकडीत बंद
मुक्ताईनगर- सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यानंतर शुक्रवारी मुक्ताईनगरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व व्यापार्‍यांनी सकाळपासून दुकाने बंद ठेवली. बंद यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.विनोद इंगळे, संतोषद बोदडे, अ‍ॅड.राहुल पाटील, रवींद्र बोदडे, राजू बोदडे, नंदू वाघ, माणिकराव इंगळे, अमोल बोदडे, किरण सावकारे, वसीम मन्सूरी, विश्वनाथ गणेश, विजय बोदडे, शे.मुशीर, आनंदा वाघ, अशोक वाघ, गणेश इंगळे, पुना इंगळे, निलेश भालेराव, पंकज चोपडे, रमेश वानखेडे, विशाल वाघ, मनोज धुरंधर, अ‍ॅड.दीपेश वानखेडे आदींनी सहकार्य केले.

विविध संघटनांचा बंदला पाठिंबा
मुक्ताईनगर बंदला मुस्लिम संघटना अल-हिरा, काँग्रेस व भारत मुक्ती मोर्चाने पाठिंबा दिला. अल हिरा संघटनेचे शकुर जमादार, सलीम खान, जाफर अली, शकील मेंबर, रफिक सलाम, आसीफ टेलर, मुशीर मन्यार, भिकन सांडू, हारून भाई, काँग्रेसचे आत्माराम जाधव, बी.डी.गवई, आसीफ खान, ईस्माईल खान, मोहम्मद आसीफ खान व भारत मुक्ती मोर्चाने नितीन गाढे, प्रमोद सौधळे आदींनी उपस्थिती देत पाठिंबा दर्शवला.