भुसावळ विभागात भाजपाचे धरणे आंदोलन

0

शेतकरी आत्महत्येसह महिलांवरील अत्याचाराचा भाजपा पदाधिकार्‍यांनी केला निषेध ः मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन

भुसावळ : शेतकरी कर्जमाफी, महिला अत्याचार, रेशन कार्डासाठी होणारा त्रास तसेच रेशनकार्ड ऑनलाईन करणे यासह भाजपा सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांमध्ये महाविकास आघाडी सरकारने बदल केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भुसावळ विभागातील तहसील कार्यालयांबाहेर भारतीय जनता पार्टीतर्फे धरणे आंदोलन छेडण्यात आले. याप्रसंगी महाविकास आघाडी सरकारवर पदाधिकार्‍यांनी टिकेची तोफ डागत तहसीलदार प्रशासनाला निवेदन दिले.

भुसावळ तहसील कार्यालयासमोर भाजपचे धरणे आंदोलन
भुसावळ-
शेतकरी कर्जमाफी, महिला अत्याचार तसेच भुसावळ तहसील कार्यालयात रेशनकार्डासाठी होणारी फिरवाफिरव, रेशनकार्ड ऑनलाईन करणे यासह विविध प्रश्‍नांसाठी भुसावळ तालुका आणि शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यलयासमोर महाआघाडी सरकारच्या विरोधात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. खिचडी सरकारचा धिक्कार असो, ठाकरे सरकारचा धिक्कार असो, सातबारा कोरा करा, महिलांवर अत्याचार करणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे, शेतकर्‍यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, हेक्टरी 25 हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे, सिंचनाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करा, कोणत्याही शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यासाठी एकाच वेळी यादी काढण्यात यायला हवी आदी घोषणाबाजी करण्यात आल्या.

यांची धरणे आंदोलनात उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश ओबीसी सेल सरचिटणीस अजय भोळे, भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, भुसावळ भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, सरचिटणीस दिलीप कोळी, प्रशांत पाटील, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, सरचिटणीस पवन बुंदेले, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, अमोल महाजन, शैलजा पाटील, पंचायत समिती सभापती मनीषा पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, कॉटन सेलचे संचालक प्रमोद सावकारे, रमेश मकासरे, नगरसेवक पिंटू कोठारी, युवराज लोणारी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, राजू सूर्यवंशी, वसंत पाटील, अजय नागराणी, शिशिर जावळे, राजु खरारे, अर्जुन खरारे, शैलजा पाटील, बेलव्हाय सरपंच मनीषा खाचणे, भाजपा नगरसेवक, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शक्ति केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख तसेच तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपा कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यात महिला असुरक्षित -जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे
रावेर- जिल्ह्यात केवळ दोन गावांच्या काही शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली असून आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती शिवाय महाविकास आघाडीने कोणतेही काम केले नसल्याचा घणाघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांनी रावेरमध्ये केला. मंगळवारी भाजपाचे राज्यस्तरीय धरणे आंदोलन सर्वत्र झाले. रावेरात झालेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष जावळे सहभागी झाले. ते म्हणाले की, सर्वत्र महिला असुरक्षित असून अनेक ठिकाणच्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांना या सरकारने स्थगिती दिली आहे. मतदारांचा विश्‍वासघात करून निर्माण झालेले सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे सूचक इशारा यावेळी त्यांनी दिला.

यांचा आंदोलनात सहभाग
रावेरच्या धरणे आंदोलनात जिल्हा परीषद अध्यक्ष रंजना प्रल्हाद पाटील, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा परीषद सदस्य कैलास सरोदे, नंदा पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील, उपसभापती पी.के.महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती सदस्य योगीता वानखेडे, जुम्मा तडवी, कविता कोळी, शिवाजीराव पाटील, सरचिटणीस महेश चौधरी, वासुदेव नरवाडे, नगरसेविका शारदा चौधरी, शहराध्यक्ष दिलीप पाटील, उमेश महाजन, मनोज श्रावगे, संजय माळी, संदीप सावळे, भास्कर बारी, सी.एस पाटील आदी तालुकाभरातील भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

मुक्ताईनगर तहसीलबाहेर धरणे आंदोलन
मुक्ताईनगर-
मुक्ताईनगर विधानसभाक्षेत्रातर्फे तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात
माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे, खासदार रक्षा खडसे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जेडीसीसी बँक अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, बोदवड कृउबा समिती सभापती निवृत्ती पाटील, नगराध्यक्षा नजमा तडवी, तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, जिल्हा परीषद समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, माजी तालुकाध्यक्ष रमेश कडू पाटील, राजू माळी, सरचिटणीस संदीप देशमुख, सरचिटणीस डॉ.बी.सी.महाजन, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, भाजयुमो विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ता पाटील, विस्तारक विलास धायडे, शहराध्यक्ष मनोज तळेले, भाजयुमो शहराध्यक्ष पियुष मोरे, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

बोदवडमध्ये महाआघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी
बोदवड- तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महाआघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दीपक पुष्कर यांना देण्यात आले. यावेळी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे, तालुकाध्यक्ष विनोद कोळी, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, गटनेते कैलास चौधरी, मधुकरराव राणे, जिल्हा परीषद सदस्य वर्षा पाटील, पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, उपसभापती प्रतिभा टिकारे, रामदास पाटील, दीपक वाणी, गोपाल गंगतीरे, दिनेश माळी, अनिल खंडेलवाल, किरण वंजारी, भरत आप्पा पाटील, सचिन राजपूत, दीपक माळी, अनिल वराडे, भागवत टिकारे, कल्पेश शर्मा, जिल्हा परीषद सदस्य भानुदास गुरचळ, नगरसेवक रेखा गायकवाड, निलम पाटील, उषा जैस्वाल, लताबाई तायडे यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.