भुसावळात विवाहितेचे धूमस्टाईलने मंगळसूत्र लांबवले

1

भुसावळ- शहरात धूम स्टाईल चोर्‍या थांबायला तयार नाहीत. जुन्या चोर्‍यांचा तपास लागत नसताना वारंवार होणार्‍या चोर्‍यांमुळे सौभाग्याचे लेणे घालावे की नाही? असा प्रश्‍न शहरातील विवाहितांना सतावत आहे. लग्नाच्या रीसेप्शनसाठी उल्हासनगरातील भुसावळात आलेल्या मनिषा रमेश पाटील (रा.यशवंत विद्यालयाजवळ, उल्हासनगर) या विवाहितेचे सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी 75 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवले. जामनेर रोडवरील हॉटेल प्रिमीअरच्या मागे असलेल्या साई चौकाच्या पुढे शिव कॉलनीजवळ ही घटना घडली. मंगळसूत्र हातात पडताच चोरट्यांनी धूम ठोकली. मनिषा पाटील यांनी येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी दोन चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी, विकास सातदिवे पुढील तपास करीत आहे.