भुसावळ शहरात एकावर प्राणघातक हल्ला

0

भुसावळ- शहरातील एकावर कुठल्यातरी कारणावरून चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दुर्गा माता मंदीरासमोरील लोको शेडजवळ 31 डिसेंबरच्या रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार जणांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. हाणामारीत एक आरोपी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोखंडी पाईपाने एकास मारहाण
लोको शेड रोडवर हर्षल सुनील जाधव (वय 21 रा. चांदमारी चाळ, भुसावळ) हे बसले असतांना संशयीत आरोपी अक्रम आबीद (चिकनवाला), साजीद अली मुश्ताक अली, इम्रान आबास अली व जावेद अली मुश्ताक आली (रा. द्वारका नगर, आगवाली चाळ, भुसावळ) यांनी हर्षल सुनील जाधवसह रीतीक गोरखनाथ सुरवाडे यांच्यावर हल्ला चढवल्याने रीतीक जखमी झाला. अक्रमने लोखंडी पाईपाने रीतीकच्या डोक्यावर जबर मारहाण केल्याने त्यास दुखापत झाली. तर यातील साजीद अली, इम्रान अली व जावेद अली यांनी जखमीस शिवीगाळ करून जिवेठार माण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात हर्षल जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैभव पेठकर पुढील तपास करीत आहे. दरम्यान, अक्रम आबीद हुसेन व साजीद मुस्ताक अली यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.