भोरटेकच्या आदिवासी तरुणाची तापी पुलावरून उडी घेत आत्महत्या

0

फैजपूर- यावल तालुक्यातील भोरटेक येथील एका आदिवासी विद्यार्थ्याने तापी पुलावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. भरत नाधव बारेला (18) मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. हा तरुण पाडळसा येथील लोक विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. हा तरुण 17 रोजी सायंकाळी घराबाहेर पडला होता. त्याच्या घरच्यांना नातेवाईकांकडे तो गेला असावा, अशी शंका होती मात्र सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तापीपुलावरील गाळा क्रमांक नऊजवळ उडी घेत आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यू दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, हेड कॉन्स्टेबल इक्बाल सय्यद करीत आहे.